| पनवेल | वार्ताहर |
सिडकोने तळोजा सेक्टर-10 मध्ये लहान मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करून पनवेल पालिकेकडे हस्तातंरित केले आहे. मात्र, पनवेल पालिकेकडून मैदानाकडे दुर्लक्ष होत असून, मैदानातील खेळणी गायब झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या उद्यान विभागाकडून खारघर आणि तळोजामधील उद्यानासह मैदानाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून त्यासाठी केबिन उभारली आहे. मात्र, ही केबिनची काही टवाळखोरांनी बॅट आणि दगडाने फोडली आहे. केबिनच्या खिडक्यांच्या काचा मैदान आणि पदपथावर टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या मुलांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.