अलिबागेत रंगला चैत्रगौरी कार्यक्रम

| अलिबाग | प्रतिनिधी |

ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबागच्या महिला आघाडीतर्फे 12 एप्रिल रोजी येथील राम मंदिरात दुपारी 4 ते 6.30 या वेळेत चैत्रगौरी सणाचे औचित्य साधून सर्व महिलांसाठी कांचनमाला कोळवणकर यांच्या साभिनय नाट्यपदांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मंदिरात गौरीची फुलांनी व शोभेच्या वस्तूंनी आरास करण्यात आली होती. माहेरपणाला आलेल्या गौरीसाठी चांदीचा झोपाळा सजविण्यात आला होता. प्रथम गौरी पूजन करून तिची आरती करण्यात आली. त्यानंतर नागाव येथील कांचनमाला कोळवणकर यांनी संगीत सौभद्र नाटकातील काही प्रवेश त्यातील पदांसह सुंदररित्या सादर करून आलेल्या महिलांचे मनोरंजन केले. उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्या अभिनयास व गायनास दाद दिली. या कार्यक्रमात सुरेश पाटील यांनी हार्मोनियम व किशोर दांडेकर यांनी तबला वाजून त्यांना साथ दिली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील महिला आघाडी प्रमुख मेघना कुलकर्णी व शुभदा ठोसर यांनी खूप मेहनत घेतली होती. संस्थेतील महिला सदस्यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी अलिबागमधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल राऊत, सचिव यशवंत थळे, खजिनदार दिलीप देवळेकर, बळवंत वालेकर, गजेंद्र दळी, दिलीप शिंदे, चारुशीला कोरडे, सुभाष क्षिरे, आर.के. घरत, ज्योती पाटील, निर्मला गायकवाड, कुसुम पाटील, अनंत देवघरकर, शरद कोरडे आदी सभासद उपस्थित होते.

Exit mobile version