सावधान! येत्या दोन दिवसात कोकणात पावसाची शक्यता

। मुंबई । प्रतिनिधी ।
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम जाणवू शकतो. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याचे चित्र आहे.

चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होणार आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version