। नेरळ । प्रतिनिधी ।
कृषी पर्यटन संकल्पना देशात पहिल्यांदा राबविणारे आणि शेतीविषयक अनेक प्रयोग करून शेतीमध्ये शेतकऱ्यांना संक्रमण निर्माण करून देणारे कृषीरत्न शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांना आणखी एका सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांनी चंद्रशेखर भडसावळे यांना मानद पदवी देऊन सन्मानित केले.
मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात कर्जत तालुक्यातील मालेगाव येथे अनेक कृषी प्रयोग करून शेतकऱ्यांना मदत करणारे चंद्रशेखर भडसावळे यांना परभणी येथे झालेल्या कार्यक्रमांत सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू आणि राज्याचे राज्यपाल डॉ. इंद्रा मणी यांच्या हस्ते चंद्रशेखर भडसावळे यांना हॉनॉरीस कौसा या मंद पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी राहुरी आणि अकोला कृषी विद्यापीठांचे कुलगुरू तसेच कृषी विद्यापीठांचे माजी कुलगुरू आणि पद्मश्री डॉ. ए. के. सिंग, संचालक संशोधन आदी उपस्थित होते.
चंद्रशेखर भडसावळे यांनी शेतकऱ्यांसाठी भाताच्या अनेक वाणांचा अनेक प्रयोगांमधून शोध लावला आहे. तर शेतीसाठी महत्वाचे ठरत असलेल्या एसआरटी तंत्रज्ञान यांचा शोध भडसावळे यांनी लावला आहे. नांगरणी न करता शेती आणि एका वर्षात तब्ब्ल तीन पिके घेता येऊ शकतील अशी तंत्र विकसित केले आहे.
चंद्रशेखर भडसावळे मानद पदवीने सन्मानित
