चांद्रयानाचा आज पुढील कक्षेत प्रवेश

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

चांद्रयान 3 ही भारताची महत्वकांक्षी मोहीम आहे. याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे. शनिवारी चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. चांद्रयान चंद्राभोवतीच्या 170×4313 या कक्षेत फिरत आहे. 9 ऑगस्टला चांद्रयान पुढील कक्षेत प्रवेश करेल, अशी माहिती इस्रोने दिली आहे. 14 जुलैला इस्रोच्या चांद्रयान 3 ने चंद्राकडे झेपावलं होतं. पृथ्वीच्या कक्षेत फेरीत मारल्यानंतर 5 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. 9 ऑगस्टला चांद्रयान आणखी आतल्या कक्षेत ढकललं जाईल. 17 ऑगस्टला चांद्रयान चंद्रापासून 100 किलोमीर उंचीवर स्थिरावेल. नंतर 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.

Exit mobile version