| मुरूड जंजिरा | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुरूड शहरातील प्रवासी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. 15 ते 30 सप्टेंबरपर्यंत एसटी बस जुन्या स्टँडवर न येता मसाल गल्ली मार्गे ये-जा करतील, अशी माहिती मुरूड बस आगार प्रमुख नीता जगताप यांनी दिली.
या संदर्भात गुरुवारी तहसीलदार कार्यालयात गणेशोत्सव पूर्वतयारी संदर्भात सर्वस्तरीय बैठक तहसीलदार रोहन शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. गणेशोत्सव दरम्यान बाजारपेठेत वाहतूककोंडी होते. हे लक्षात घेता मसाल गल्ली मार्गे बसेस धावतील, असा निर्णय घेण्यात आला.