तालिबान्यांचे वर्चस्व प्रस्थापित
महिलांच्या सुरक्षेचा मुद्या ऐरणीवर
काबूल | वृत्तसंस्था |
अफगाणिस्तानावर पूर्णपणे कब्जा मिळविणार्या तालिबानी संघटनेेने आता अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता तालिबान्यांचा उन्माद काबूलच्या चौकाचौकात दिसून येतो. शहरात जिकडे दिसेल तिथे त्यांचा धुमाकूळ सुरू आहे.अतिरेक्यांकडून महिलांवर अन्ववित अत्याचार केले जात आहे.अनेक ठिकाणी महिलांचे जाहीर लिलावही होण्याचे प्रकार घडल्याने आंतरराष्ट्रीय समुहाने याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.या पार्श्वभूमीवर तालिबानी नेत्यांनी महिलांनाच सरकारात सामील व्हा,असा फतवा काढला आहे.जेणेकरुन त्यांच्या सुरक्षितता अबाधित राखली जाईल,असे भासविले जात आहे.
तालिबान्यांचा धिंगाणा
अफगाणिस्तानचे अनेक राजकीय नेते तालिबान्यांच्या भीतीनं देश सोडून पळून गेले आहेत. अनेक नागरिकांनी भीतीनं आपली घरं सोडली आहेत. त्यांच्या घरावर आता तालिबान्यांचं राज्य आहे. आणि तिथलं वैभव त्यांनी ओरबाडायला सुरवात केली आहे. कुठे विक्षिप्त नाच, कुठे ट्रॅम्पोलिनवर माकडउड्या, कुठे डॅश कारची मारामारी. लहान मुलांच्या खेळण्यांनाही या तालिबान्यांना सोडलं नाहीये.
भारतीय नागरिक मायदेशी
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अडकून पडलेल्या भारतीय दूतावासात काम करणार्या अधिकारी, कर्मचारी आणि भारतीय नागरिकांना घेऊन भारतीय हवाई दलाचं दुसरं विमान गुजरातमध्ये दाखल झालंय. सोमवारी हे विमान काबूलमध्ये अडकून पडलं होतं. परंतु, मंगळवारी दुपारी 12 वाजल्याच्या सुमारास भारतात दाखल झालंय. सी 17 ग्लोबमास्टर हे विमान गुजरातच्या जामनगरमध्ये उतरवण्यात आलंय. या विमानात भारतीय राजदूतांसहीत जवळपास 120 जणांचा समावेश आहे. भारतात दाखल झाल्यानंतर या भारतीय नागरिकांना भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
विमान नव्हे वडापच
अफगाणिस्तानमधील भीषणता दाखवणारा एका फोटो सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. अमेरिकेच्या 134 सीटर विमानात तब्बल 800 लोकांनी प्रवेश केल्याचं आणि तिथेच ठिय्या मांडल्याचं या फोटोतून दिसतंय. अमेरिकेतील डिफेन्स वन या वेबसाईटने हा फोटो अपलोड केला आहे. अमेरिकेच्या वायूदलाचे सी-17 ग्लोबमास्टर हे विमान अमेरिकन नागरिकांची सुटका करण्यासाठी काबुलला गेलं होतं. या विमानातील प्रवासी संख्या ही 134 इतकी आहे. पण जसं या विमानाचे दार उघडले तसं विमानतळावर असलेल्या अफगाणी नागरिकांनी यामध्ये प्रवेश केला.
विमानात प्रवेश केलेल्यांपैकी 640 लोक हे अफगाणी नागरिक आहेत. अमेरिकन सैन्याने त्यांना वारंवार बाहेर जायला सांगितले तरीही ते ऐकत नव्हते. त्यांनी विमानातच मिळेल त्या ठिकाणी ठिय्या मांडला. अफगाणिस्तानमध्ये राहिलो तर आपल्याला ठार मारलं जाईल असं सांगत तुम्ही घेऊन जाल तिकडे येतो पण उठणार नाही अशी भूमिका या नागरिकांनी घेतली.
तालिबानी सरकारने अमेरिकेविरोधात भूमिका घेतल्यास त्यांना कधीही विचार केला नसेल एवढे गंभीर परिणाम भोगावे लागती.
जो बायडेन,अमेरिकन राष्ट्राध्यक्ष
सरकारमध्ये महिलांचाही होणार समावेश!
नागरिकांच्या संरक्षणाची ग्वाही दिली जात असताना तालिबानी नेत्याने एक मोठे वक्तव्य केले आहे. महिलांचे तालिबान सरकारमध्ये स्वागत असल्याचे म्हटले आहे. महिलांनी तालिबान सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करावा असे आवाहन इस्लामिक एमिराटफचे सांस्कृतिक आयोगाचे एनामुल्लाह यांनी एका वाहिनीशी बोलताना हे वक्तव्य केले आहे. ता तालिबान आपल्या सरकारमध्ये महिलांचाही समावेश करणार आहे. महिलांना कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा सामना करावा लागू नये असे तालिबानला वाटत असल्याचे त्यांनी म्हटले.