कोर्लईच्या मायने लावला लळा

भाजी, कडधान्य विक्रीद्वारे चरितार्थ
| रेवदंडा | महेंद्र खैरे |
अलिबाग, रोहा, मुरूड, पेण, महाड,श्रीवर्धन,तळा, माणगांव आदी तालुक्याच्या भाजीमार्केटसह गावागावात ताजी भाजी, विविध कडधान्य, रताळी, कलिंगड, काकडी, चिबूड आदीची विक्री करताना, एका वैशिष्टपुर्ण ख्रिश्‍चन पेहरावात व आगळी वेगळी भाषा बोलणारी कोर्लईची माय सर्वश्रुुत आहे. कोर्लईतील अद्यापही पोर्तुगीजांचे वंशज ख्रिश्‍चन बांधव वास्तव्य करुन आहेत. शेती, भाजी, विविध कडधान्य, रब्बी व हंगामी उत्पन्नाचे व्यवसाय करून उदरनिर्वाह करू लागले.चारशे वर्षानंतर सुध्दा हे कोर्लई गावात राहत असून त्यांनी अंगिकारलेला उत्पन्नाचे व्यवसाय अदयापी सुरू आहेत.

कोर्लई ख्रिश्‍चन पाडयातील हे ग्रामस्थ फारच कष्टाळू असून शेतातून भातपीकासह पावसाळी,हिवाळी व उन्हाळी हंगामात मुळा, वांगी, टोमॅटो, कोंथिबीर, मिरची,आदी भाज्यांसह काकडी, चिबूड तसेच विविध कडधान्ये यांचे उत्पन्न घेतात. कोर्लईतील ताजी भाजी व गावठी भाजी ही तालुक्यातील अलिबाग, रोहा, मुरूड,पेण, महाड, श्रीवर्धन,तळा आदी तालुक्याचे ठिकाणी तसेच रेवदंडा, चणेरा, नागाव, नांदगाव आदी गावागावात ग्राहकांच्या पहिल्या पंसतीची आहे. तर महाशिवरात्रीच्या सुमारास कोर्लईची प्रसिध्द रताळीला खुपच मोठी मागणी असते. ही वैशिष्टपुर्ण कोर्लईची रताळी खुपच प्रसिध्द असून ग्राहकांची मोठी मागणी असते.

कोर्लई मध्ये उत्पन्न घेतली जाणारी भाजी, कडधान्ये, व रताळी विक्री करता, कोर्लई ख्रिश्‍चन पाडयातील कोर्लईची माय प्रत्येक भाजी मार्केट मध्ये नित्याने आढळते, या कोर्लई ख्रिश्‍चन माय आगळी वेगळी अशी क्रिओल भाषा, कोर्लई ख्रिश्‍चन बांधव या भाषेस नौ लिन्ग ( आमची भाषा) बोलत असतात, त्यामुळे ते निश्‍चित लक्ष्य वेधून घेतात. नित्याने भाजी मार्केट मध्ये आढळणारी कोर्लई ची माय सर्वश्रूत असून कोर्लईची प्रसिध्द ताजी भाजी, कडधान्य, विशेष म्हणजे रताळी ग्राहकांपर्यंत पोहचवत असते.

Exit mobile version