माथेरानमधील शार्लोट लेक ओव्हर फ्लो

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान शहरात असलेल्या शार्लोट लेक हा तलाव पाण्याने भरला आहे. अवघे दहा दिवस पाऊस पडल्यानंतर माथेरानमधील शार्लोट लेक पाण्याने भरून वाहू लागला आहे. माथेरानमध्ये असलेल्या या शार्लोट लेक तलावातून पाण्याचा विसर्ग होऊ लागला आहे. दुसरीकडे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तेथे बंधारा तयार झाला असून, हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे.

माथेरान शहराला पाणी पुरवठा व्हावा, यासाठी ब्रिटिशांनी शार्लोट लेकची निर्मिती केली. या लेक परिसरात गेली आठ दिवस सातत्याने पावसाने हजेरी लावली होती. शहरातील पाण्याची नोंद दोन हजार मिलीमीटरचे पुढे गेली. आठ-दहा दिवस झालेल्या पावसामुळे हा शार्लोट लेक तुडुंब भरला. शार्लोट लेक भरला, त्याचा आनंद पर्यटक धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर घेवू शकले नाहीत. मात्र, माथेरानमध्ये पावसाळ्यात येणारे पर्यटक हे प्रामुख्याने शार्लोट तलावाच्या सांडव्याचे पाण्याचे धबधब्यात रूपांतर होते. आता शारलोट लेक येथील धबधबा तुडुंब भरून वाहू लागल्याने पर्यटक मोठ्या संख्येने माथेरानकडे वळणार आहेत. तर धरण पाण्याने भरल्यांमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या संपली आहे.

Exit mobile version