। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
चिपळूण शहरातील गोवळकोट रोड येथील एका महिलेची नोकरीच्या अमिषाने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, महिलेने तिच्या मोबाईलवर नोकरीसंदर्भात आलेल्या लिंकच्या सहाय्याने ऑनलाइन फॉर्म भरला. यानिमित्त महिलेकडून तिच्या क्रेडिट कार्डची माहिती घेऊन संशयिताने एक लाखाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.