प्रेम प्रकरणातून तरुणीची फसवणूक

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
प्रेमाचे नाटक करून एका युवतीची सुमारे चार लाखाची फसवणूक झाली असल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी आरोपी आदित्य जाधव (१९) यास अटक केली आहे. आदित्यने फिर्यादी तरुणी (१९) हिच्या सोबत ३ वर्ष प्रेमाचे नाटक करून तिचा विश्वास संपादित केला तसेच तिचा गैरफायदा घेत वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून बाहेर भेटायला बोलावून वेळेप्रसंगी मारहाण करून फिर्यादीला व तिच्या छोट्या भावाला ठार मारण्याची धमकी देत रोख रक्कम व दागिने असा एकूण ३ लाख ९४ हजार आठशे रुपये किमती एवज काढून घेत फसवणूक केली.

Exit mobile version