चित्रकार चेतन पाशीलकरचे जंगी स्वागत

| पाली-बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील तळई या छोट्याशा गावातील दिव्यांग (कर्णबधिर) चित्रकार चेतन पाशिलकर याने भारत देशाचे नाव उंचावले आहे. फ्रान्समध्ये झालेल्या 10 व्या इंटरनॅशनल एबीलिंपिक्स चित्रकला स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. या यशाबद्दल पाशीलकर कुटुंबीय व समस्त सुधागड तालुक्याच्या वतीने पालीत चेतन यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच पालीतील शिवस्मारक ते बल्लाळेश्‍वर मंदिरापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली.

यावेळी चेतन यांच्यावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आला. या रॅलीत चेतन यांचे आईवडील, नातेवाईक, मित्रपरिवार व समस्त सुधागड वासीय मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. शब्बास चेतन पाशीलकर, देशाचे नाव उंचावलेस, रायगडकरांची मान अभिमानाने उंचावली असे वाक्य प्रत्येकाच्या तोंडी होते.

Exit mobile version