| मुंबई | प्रतिनिधी |
मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात न आल्याने छनग भुजबळ यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. छगन भुजबळांसह दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांनाही मंत्रिमंडळातून नारळ देण्यात आला आहे. दरम्यान, नाराज भुजबळांनी प्रसाद माध्यमांशी बोलताना मी नाराज आहे, दादांसोबत कालपासून चर्चा केलेली नाही. मला ते गरजेचं वाटत नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय, फेकलं काय, काय फरक पडतो. पण अशी किती मंत्रीपदं आली आणि गेली, पण छगन भुजबळ संपलेला नाही, अशी प्रतिक्रिया दिली.