| पनवेल | वार्ताहर |
देशामध्ये बालविवाहाचे प्रमाण कमी होण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार पनवेल महानगरपालिकेच्यावतीने बालविवाहमुक्त भारतप्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त रविकिरण घोडके, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान गीते, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बालविवाहाचे दुष्परिणाम, बालकांचे हक्क आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याविषयी प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आजपासून केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने बालविवाह मुक्त भारत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर मा. सह सचिव महिला व बाल विकास विभाग भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या व्हीसीनुसार बाल विवाह मुक्त भारत प्रतिज्ञा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, त्यानुसार ही प्रतिज्ञा घेण्यात आली.