अतिरिक्त भारतीय सैन्य तैनात
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
चिनी लष्कराने उत्तराखंडजवळच्या बाराहोटी श्रेत्रामधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ म्हणजेच एलएसीजवळ हलचाली वाढवल्याचं चित्र दिसत आहे. चीनच्या या कुरापतींमुळे भारतही सज्ज झालेला आहे. नुकतीच या ठिकाणी चीनच्या पिपल्स लिब्रेशन आर्मीमधील (पीएलए) जवानांची एक तुकडी सक्रीय असल्याचं दिसून आलं.
सुत्रांनी एएनआय या वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, नुकतेच येथे पीएलएचे 35 सैनिकांची एक तुकडी नजरेस पडली. ही तुकडी उत्तराखंडमधील बाराहोटी परिसराच्या आसपास सर्वेक्षण करताना दिसून आली. चीनच्या बाजूच्या प्रदेशामध्ये काहीजण दिसून आल्याचेही यावेळी सांगण्यात आलं आहे. चिनी सैनिक या ठिकाणी सर्वेक्षण करत असल्याचं दिसून आलं आहे.
चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत आणि केंद्रीय सेना प्रमुख लेफ्टनंट जनरल व्हाय डिमरी यांनी नुकताच या ठिकाणी पहाणी दौरा केला. येथील परिस्थिती आणि एकंदरित कारभाराचा सर्व समीक्षा त्यांनी केलीय.