महिलेसोबत नको त्या अवस्थेत सापडला
| रत्नागिरी | वृत्तसंस्था |
एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्याला युवतीसोबत ऑफिसमध्ये वेगळ्या अवस्थेत पकडल्यानंतर जमावाने या पदाधिकार्याला बेदम मारहाण केली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील कार्यालयात हा पदाधिकारी एका महिलेसोबत होता. भर दिवसा कार्यालयाचे दरवाजे बंद करून हा पीडित महिलेसोबत आत होता. गेल्या काही दिवसांपासून या पदाधिकार्याच्या वागणुकीवर स्थानिकांना संशय होता. हा पदाधिकारी नेहमी प्रमाणे कार्यालयात आला होता. पीडित महिला ही याच कार्यालयामध्ये कामाला होती. दुपारच्या वेळी परिसरात वर्दळ कमी झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने कार्यालयाचे शटर बंद केले. महिलेचे निकटवर्तीय कार्यालयावर पोहोचले आणि शटर उघडून आत गेले. तेव्हा दोघेही नको त्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे संतापलेल्या जमावाने या पदाधिकार्याला चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून या पदाधिकार्याला ताब्यात घेतले. कार्यालयापासूनहाकेच्या अंतरावरच पोलिस स्टेशन आहे. पोलिस या पदाधिकार्याला पोलिस स्टेशनला घेऊन जात होते, तेव्हा पुन्हा एकदा संतप्त जमावाने या पदाधिकार्यावर हल्ला केला. भर रस्त्यावर जमावाने त्याला बेदम मारहाण केली.