कोर्लई ख्रिश्चन पाड्यातून बंडखोर आ. महेंद्र दळवींना हाकलले

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायतीत प्रचारासाठी आलेल्या बंडखोर निष्क्रिय आमदार महेंद्र दळवी यांना ख्रिश्चन पाड्यातून ग्रामस्थांनी हाकलल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघात बंडखोर आमदाराचे चांगलेच हसे झाले आहे.
कोर्लई ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे. मात्र या ग्रामपंचायतीवर कब्जा करण्याच्या मनसुब्यातून मंगळवारी शिंदे गटाचे बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांनी ख्रिश्चन पाड्यात प्रचार सभा आयोजित केली होती.
या सभेत कृतीशून्य महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा बढाया मारण्यास सुरुवात केली. आतापर्यंत चार ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. ही ग्रामपंचायत देखील बळकायची असल्याचे मनसुबे त्यांनी ग्रामस्थांना बोलून दाखवले. निष्ठावंत मतदार असलेल्या ग्रामस्थांचा हा प्रभाग समजला जातो. त्यामुळे सुरुवातीला ऐकून घेत असलेल्या ग्रामस्थांच्या संयमावरील ताबा सुटल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आमदारांना खरेखोटे सुनावण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांचा पवित्रा पाहून मनसुभे धुळीस मिळण्याची चिन्ह लक्षात आल्याने आमदारांनी आपल्या बगलबच्यासोबत तिथून पळ काढला.

Exit mobile version