जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे आवाहन
| अलिबाग । वार्ताहर ।
सध्या तापमानात प्रचंड वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी आवश्यकता नसल्यास नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये. आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.
उष्माघात होवू नये म्हणून थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे, सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/टोपी, बूट वा चप्पलचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाकडून देण्यात येणार्या सूचनांचे पालन करावे. नागरिकांकरिता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सदैव सज्ज आहे. नागरिकांनी काळजी करू नये, काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी केले आहे.