। रसायनी । राकेश खराडे ।
लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्र व एम. जी. एम. दंत चिकित्सा महाविद्यालय कळंबोली यांच्या सहकार्याने बिर्ला कार्बन इंडिया प्रा. लि. यांच्या प्रयत्नाने बाह्यरुग्ण सेवा ओपीडी उद्घाटन करण्यात आले. ही बाह्यरुग्ण सेवामोफत असून या सेवेत दंत, अस्थी, बाल, महिला व त्वचारोग तज्ञ डॉक्टर उपलब्ध असणार आहेत.
या उद्घाटन समारंभासाठी एम.जी.एम दंत चिकित्सा विद्यालयाच्या डॉ. श्रीवल्ली नटराजन, एचओडी वैभव थक्कर, व डॉ. मौसमी मळगावकर व त्यांची टीम उपस्थित होती. तसेच खालापूर तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिलकुमार शहा उपस्थित होते. बाह्यरुग्ण सेवा विभाग सेवेचे उद्घाटन बिर्ला कंपनीचे युनिट हेड रवींद्र रघुवंशी, पुनिंडो कुमार, नितीन अग्रवाल हे बिर्ला कंपनीच्या वतीने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ग्रुप ग्रामपंचायत इसांबेच्या उपसरपंच ज्योती पाटील उपस्थित होत्या.
लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु करण्यात आलेल्या बाह्यरुग्ण विभाग याची सेवा उपलब्धता ही श्री समर्थ सामाजिक विकास सेवा संस्था रसायनी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. या संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील यांची पुढील उपचार सेवा नियोजन धुरा सांभाळली असून निश्चितच याचा लाभ सर्व जनतेला मिळणार आहे.