। पनवेल । वार्ताहर ।
सुतारकाम करणार्या 18 वर्षीय रुग्णाने काम करत असताना चुकून एक खिळा गिळला. त्याला बाणेरच्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तत्काळ त्याचा एक्स रे काढण्यात आला. त्याच्या आतड्याच्या वरच्या भागात एक अणकुचीदार खिळा अडकला होतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन डॉ. प्रसाद भाटे यांच्या टिमने वेगाने काम करत हा खिळा काढण्यासाठी एन्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. हा खिळा कोणतीही शस्त्रक्रिया न करता अगदी सहजपणे काढण्यात डॉ. प्रसाद भाटे यांच्या टिमला यश प्राप्त झाले.