खोपोलीत सिटीबस सेवा सुरू

खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली शहर काँग्रेस, आम्ही खोपोलीकर सामाजिक संस्था व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी खोपोली नगरपालिका परिवहन सेवा अंतर्गत सिटीबस सेवा नियमित सुरू होण्यासाठी मागील तीन महिने सतत पाठपुरावा केला. काँग्रेसच्या माध्यमातून तर यासाठी धरणे आंदोलनही करण्यात आले होते. या सर्वांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, सोमवार, दि.10 जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने सिटीबस सेवा सुरू करण्यात आली आहे.
यासंदर्भात सिटी बस सेवा देणारे ठेकेदार व नगरपालिका प्रशासन यांच्यात मागील दहा दिवस लागोपाठ बैठका संपन्न होऊन अखेर सोमवार, दि.10 जानेवारीपासून ही सेवा सुरू झाली. सुरुवातीला जवळचे तीन मार्ग व टप्प्याटप्प्याने नियमित मार्गांवर ही सेवा सुरू होईल. पूर्वीप्रमाणे सर्व मार्गांवर नियमितपणे सिटीबस वेळापत्रक नुसार सुरू होणार असून, यासाठी एक आठवडा लागणार आहे. सेवा सुरू झाल्याने खोपोली शहर काँग्रेसचे अध्यक्ष रिचर्ड जॉन यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version