| रेवदंडा | प्रतिनिधी |
करणी केल्याने पती मयत झाला, अशा समजातून महिलांच्या दोन गटात हाणामारी झाल्याचा प्रकार साळावनजीक घडला. याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही घटना संजयनगर येथे घडली. एका कुुटुंबातील महिलेचा पती मयत झाला. त्यांचा मृत्यू करणी केल्यानेच झाल्याच संशय व्यक्त करीत त्या महिलेने याचा जाब संबंधित महिला आणि तिच्या पतीला विचारला. त्यावरुन त्यांच्यात बोलाचाली झाली .त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. परस्परांवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रकारही घडला. अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार 1824 संजय एकनाथ ठाकूर हे करत आहेत.