| बोर्ली पंचतन | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली दांडगुरी-श्रीवर्धन रोड हा वाहतुकीच्या दृष्टिने खूप वर्दीळीचा रोड आहे. दांडगुरी आसुफ पासुन बोर्ली पर्यंतचा रोड खुप अरुंद असून, दोन वाहन मुश्किलीने पास होत असतात, त्यात मे महिन्यात रस्त्यालगत साईड पट्टया खोदून खासगी मोबाईल कंपनीने भूमिगत केबल टाकण्याच काम केल आहे. त्याच खोदलेल्या साईडपट्ट्या ठेकेदाराकडून व्यवस्थित पद्धतीने न भरल्या कारणाने पावसाचे पाणी साचुन त्या खचत चालल्या आहेत. त्याचा नाहक त्रास वाहनचालकांना होत आहे.
बोर्ली ते दांडगुरी मध्यभागी असलेल्या आसुफ गावाजवळ पिकअप टेम्पो ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना साइडपट्टीला उतरला असता दोन्ही टायर मातीत रुतून अडकून बसला. रात्रीच्या वेळीस खचलेल्या साईड पट्टीचा अंदाज येत नसल्या कारणाने खूप मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच खुजारे बसस्थानकाजवळ असलेला पूल धासत चालाला असून कधीही कोसळून रस्ता बंद पडून वाहुतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो. संबंधित विभागाने व ठेकेदाराने या गोष्टीवर लक्ष देणे गरजेचे आहे. असा सवाल वाहन चालक व नागरिक उपस्थित करत आहेत.