प्रवाशांना मारहाण करत 15 तोळे सोने लुटले
| पेण | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्री दोन व्यावसायिकांमध्ये जोरदार झटापट झाली. दोन नंबरच्या व्यवसायाच्या वादातून झालेल्या या राड्यात जोरदार दगडफेक देखील करण्यात आल्याचे वृत्त आहे.
पेण तालुक्यातील कोपर फाटा येथील हॉटेल मिलन पॅलेससमोर ही झटापट झाली. यावेळी 20 ते 25 जणांच्या टोळक्याने मुंबई-गोवा महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांनाही लुटले.
दापोलीवरून बोरीवली येथे जाणाऱ्या प्रवाशांना मारहाण करत 15 तोळे सोने लुटले असल्याची घटना घडली आहे.सदर घटनेत आरोपींकडून स्विफ्ट, स्कोडा व अर्टिका या 3 गाड्यांचा वापर करण्यात आला आहे.