पनवेलमधील नाल्यांची साफसफाई

| पनवेल | प्रतिनिधी |

पावसाळ्यात नवीन पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्यामुळे यंदा महानगरपालिकेकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. नवीन पनवेलमधील मुख्य नाल्यांची युद्धपातळीवर साफसफाई सुरू असून, मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ काढण्यात येत आहे. पाण्याचा निचरा सुरळीत राहावा आणि नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नाल्यातील कचरा व अडथळे हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे. पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती टाळण्यासाठी पालिकेकडून व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.

Exit mobile version