मैत्री ग्रुपतर्फे स्वच्छता मोहीम

| तळा | प्रतिनिधी |

तळा तालुक्यातील मालाठे येथे असलेल्या द्रोणागिरी देवस्थान परिसरामध्ये मैत्री ग्रुपतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मालाठे येथील द्रोणागिरी देवस्थान हे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. एप्रिल महिन्यात भरत असलेल्या द्रोणागिरी यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक याठिकाणी दाखल होत असतात. येथील परिसराचे पावित्र्य जपले जावे, तसेच हा परिसर कायम स्वच्छ रहावा या उद्देशाने मालाठे येथील मैत्री ग्रुपतर्फे याठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी द्रोणागिरी देवस्थान, धुळ्यावरचा माल येथे फलक लावून पद्मावती आई गाभारा व परिसर, श्री द्रोणागिरी विनोबा देवाचा गाभारा व परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी मैत्री ग्रुप मालाठे अध्यक्ष प्रणित ठमके, उपाध्यक्ष रोहित गायकर, सल्लागार मंगेश माने, सदस्य भरत गायकर, सुहास गायकर, रोहित माने, नरेश ठमके व ज्ञानेश्वर महाडिक आदी उपस्थित होते.

Exit mobile version