माथेरानमध्ये गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम

| माथेरान | वार्ताहर |

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त माथेरान नगरपरिषदेच्या वतीने विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे( शिंदे ) ,पाणी पुरवठा अधिकारी अभिमन्यु येळवंडे, अन्सार महापुळे, स्वप्नील कळंबे, ज्ञानेश्‍वर सदगीर, एस.आई.नरेंद्र सावंत, स्नेहा साखळकर, धनगर समाजाचे माजी अध्यक्ष राकेश कोकळे त्याचप्रमाणे सफाई कामगार या स्तुत्य उपक्रमात सहभागी झाले होते.

येथील मुख्य पर्यटन विभाग असणार्‍या शारलोट लेक परिसरात जवळपास ऐंशी गोणी प्लास्टिक बाटल्या, आणि अन्य प्लास्टिक जन्य सुका कचरा गोळा करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेसाठी माथेरानचे स्वच्छता दूत प्रमुख म्हणून राकेश कोकळे यांची निवड करण्यात आली होती.स्वतः मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी झाडू हातात घेऊन जंगलात तसेच रस्त्यावरील कचरा संकलन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. अत्यंत कमी वेळात भणगे यांनी आपल्या कामाच्या एका विशिष्ट पद्धतीने स्वच्छता बाबतीत असो की अन्य कोणत्याही सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभाग नोंदवून कामाला गती दिली आहे त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

जवळपास 100 गोणी प्लास्टिक आम्ही 3 तासात वेचले. जंगलात बॉटल्स, इतर पेयच्या बाटल्या, प्लास्टिक रॅपर्स मोठ्या प्रमाणात पाहवयास मिळाले. त्यांना आता प्रत्येक टपरी, दुकानदार यांची एक महत्वाची बैठक घेऊन या बाबतीत चर्चा करून त्यावर नक्कीच उपाय शोधणार आहोत.

सुरेखा भणगे (शिंदे), प्रशासक
Exit mobile version