| खोपोली | वार्ताहर |
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत कार्मेल कॉन्व्हेन्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खोपोली सद्भावना यात्रा काढण्यात आली होती. राष्ट्रपुरुषांचा जयघोष करत देशभक्तीपर नारे देत महात्मा गांधींनी दिलेला स्वच्छतेचा संदेश अंगीकारून खोपोली शहरातील बस स्टॅन्ड, पोलीस स्टेशन, समाज मंदिर रोड आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारील परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. कार्मेल कॉन्व्हेन्ट स्कूलच्या लोकल मॅनेजर सिस्टर लिली पॉल आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यपिका सिस्टर आयविन क्रीडा शिक्षक जगदिश मरागजे, समीर शिंदे, स्काऊट मास्टर संदीप साळुंखे, कला शिक्षक अशोक भालेराव, संगीता हरिकृष्णन आणि इतर शिक्षकांनी महात्मा गांधी जयंती निमित्त विविध कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला होता.