आदिवासी बांधव उपजीविकेच्या गर्तेत
| अलिबाग | वार्ताहर |
सध्याच्या हवामान बदलाचा विपरीत परिणाम यंदाच्या वर्षी रानमेव्यावर झाला आहे. या वर्षी अवकाळी पाऊस झाल्याने पिक कमी आले. याचा दुष्परिणाम जांभूळ, करवंद, राजण, अटूर्ण-पिटूर्णसह काजु या रानमेव्यावर झाला आहे. या वर्षी पिक कमी आले असल्याने खेडयातील शेतकरी व वाडयांतील आदिवासी हाताश झाले आहे. जिल्ह्यातील अनेक डोंगर भागात आदिवासी वाडया आहेत. यातील अनेक आदिवासी बांधवाना खास आसे उपजिवीकेचे साधन नाही. या आदिवासी वाडयांतील बांधवांना आणि खेडयातील काही शेतकर्यांना ऊन्हाळयात जाम, जांभळ, करवंद, आंबे, काजु आदि जंगलातील रानमेवा विकुन घर खर्चाला दर वर्षी चांगला आधार होत आहे. मात्र या वर्षी पिक कमी आले आहे. त्यामुळे शेतकर्यांसह आदिवासी बांधव काळजीत पडले आहेत.
मागील वर्षी पाऊस चांगला झाला. त्यानंतर थंडीही चांगली पडली. फळ झाडांना मोहर येत असताना ढगाळलेले हवामान, पडणारे धुके, आणि आवकाळी पाऊस या खराब हवामानाचा झाडांना मोहोर येताना परिणाम झाला आहे. दरम्यान या वर्षी रानमेव्याचे पिक कमी आले आहे. तसेच जिल्हाभरातील बाजार पेठेत जांभुळ, काजु विक्रीसाठी येऊ लागले आहे. जांभळाला किलोला सुमारे शंभराहून अधिक रूपये भाव मिळत असल्याचे सांगण्यात आले. खेडयातील शेतकरी व वाडयांतील आदिवासी हाताश झाले आहे. त्यामुळे बाजार पेठेत कमी प्रमाणात जांभळे, काजु हा रानमेवा विक्रीसाठी येऊ लागला आहे. थोडया दिवसात जांभळांची आवक वाढेल असे सांगण्यात आले. फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत जंगलातील विविध फळेही बाजारात येत असतात. हा व्यवसाय रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिला करीत असतात. या वर्षीही रानमेवा काजूगर, रांजणे, करवंदे, जांभळे, काजू बाजारात दाखल झाले आहेत. ओले काजूगर सातशे रुपये किलो तर काजूचा वाटा शंभर रुपये असा विकला जात आहे. तो खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.