। रोहा । वार्ताहर ।
बळीराजा फाऊंडेशन रोहा संचालित युवा कृषी उद्योग निवी तरुणांनी पूर्णतः यशस्वी सामूहिक शेती केली आहे. या शेतीला जिल्हा कृषी अधीक्षक वंदना शिंदे यांनी भेट दिली. नोकरदार, व्यवसायिक तरुणांनी एकत्र येत तब्बल 6 एकर शेतीत कलिंगड, भाजीपाला, कडधान्याची शेती केली. तरुणांत आवड निर्माण व्हावी. तरुण शेतीकडे वळावा. शेती फायद्याची असल्याचे समोर यावे. याच उद्देशाने हा कृतीशील शेती प्रयोग सुरू झाला. विविध संस्था यांच्या सहकार्यातून सामुहिक शेती प्रयोग यशस्वी ठरत आहे. बेरोजगारीवर सामूहिक शेती हा उत्तम पर्याय असल्याची प्रतिक्रिया जिल्हा कृषी अधीक्षक वदंना शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी आत्मा प्रकल्पाचे संचालक अतिश बोर्हाडे, तालुका कृषी अधिकारी महादेव करे, ए. एस.सुतार, कविता दोरगुडे, प्रकाश राक्षीकर, विठ्ठल मोरे, संस्थापक राजेंद्र जाधव, सचिव अॅड. दीपक भगत, प्रशांत राऊत, जितेंद्र तुपकर, बाळा भगत, विनायक पाटील, नितेश बामगुडे, शेतकरी, कृषी अधिकारी उपस्थित होते.
कृषी अधीक्षक वंदना शिंदे यांनी सामुहिक शेतीतील कलिंगड, भाजी कडधान्य शेतीची पाहणी केली. शेतीसाठी लागणार्या पाण्यासाठीचे बंधारे शेतकर्यांच्या अडचणीची माहिती घेतली. पावसाळी पाण्याचा प्रवाह ओहोळवर कृषी विभागाच्या माध्यमातून मोठा बंधारा बांधण्याचे संकेत त्यांनी शेतकर्यांना दिले. नोकरी व्यवसाय सांभाळून तरुण दुसर्याच्या पडीक जागेत सामुहिक शेती करतात. त्यातून आनंद घेत शेतीतील फायद्याचा शोध घेतात. हे पाहून खूप समाधान वाटले, असे वदंना शिंदे म्हणाल्या.
सामूहिक शेतीच्या प्रयोगातून तरुणांत आवड निर्माण व्हावी. पडीक शेती लागवडीत यावे.यासाठीच आम्ही हा प्रयोग हाती घेतला आहे. कालव्याच्या पाण्यासाठी संघर्ष चालूच आहे. कालव्याला पाणी आले तर संबंध परिसर हिरवेगार होईल.
– राजेंद्र जाधव, संस्थापक
बळीराजा फाउंडेशन