। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहर पोलीस ठाण्यामार्फत परिसरात करण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशन तसेच ऑल आऊट दरम्यान मोठी कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ-2चे पोलीस उप आयुक्त प्रशांत मोहिते, सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे व त्यांच्या पथकाने पनवेल शहरातील जय भारत नगर, खाडी किनारी झोपडपट्टी भागांत, पुष्पकनगर, पनवेल रेल्वे स्टेशन व एस.टी. स्टॅन्ड परिसरात कोम्बिंग ऑपरेशन तसेच ऑल आऊट मोहीम राबविण्यात आली. यावेळी अमली पदार्थ सेवन करणार्या तिघांविरोधात कारवाई करण्यात आली. तसेच, देशी विदेशी दारू विक्री तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, गर्दी मारामारीच्या गुन्ह्यातील 1 संशयीत आरोपी व हिस्ट्रीशिटर चीटर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, नाकाबंदी दरम्यान 182 वाहने तपासणी करण्यात आली असून 39 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर 3 संशयित बांगलादेशी व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.