तिवरे गंगेचीवाडी येथे गाळ काढण्यास सुरुवात
| चिपळूण । वार्ताहर ।
तिवरे गंगेचीवाडी येथील पाहणी केली असता तेथील ग्रामस्थांनी गाळ काढण्याची विनंती केली होती. याची दखल घेत आ. निकम यांनी पाठपुरावा करत जलसंधारण विभाग आणि पाटबंधारे विभाग यांच्या सहकार्याने तिवरे गंगेचीवाडी येथील गाळ काढण्याचा शुभारंभ अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते करण्यात आला.
या कामासाठी जिल्हाधिकारी बी.एन. पाटील, श्री. खोत, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी आदींनी सहकार्य केले. यावेळी स्वप्नील शिंदे, गजानन साळळी, आबाभाई शिंदे, भालचंद्र पाचांगने, विलास शिंदे, सुरेश कदम, रवींद्र पाचांगने, ओंकार पाचांगने, सौरभ पाचांगने, विकास गावकर, महादेव गावकर, चंद्रकांत पवार, पांडुरंग पवार, जयश्री पवार, सुभद्रा पवार, सरस्वती म्हादळेकर, माधुरी पवार, अनंतराव शिंदे, बाबाराम शिंदे, महेश शिंदे, सुधीर पंचांगने आदी मान्यवर उपस्थित होते.