कमान अधिकारीपदी कमांडंट प्रशांत गोजरे

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
भारतीय तटरक्षक दल मुरूड जंजिराच्या कमान आधिकारी म्हणून कमांडंट प्रशांत गोजरे यांनी कमांडंट अरूण सिंह यांचे कडून सूत्रे हाती घेतली. गोजरे हे मूळचे नाशिकचे रहिवाशी असून ते जुलै 1994 पासून भारतीय तटरक्षक दलाच्या सेवेत आहेत. याआधी त्यांनी भारतीय तटरक्षक दलात 25 वर्षे वैमानिक म्हणून काम केले आहे. मुबई, कोची, पोर्टब्लेअर, कलकत्ता, गांधीनगर, चैन्नई येथे त्यांनी संक्रिय अधिकारी, कमान अधिकारी, विभागीय वैमानिक अधिकारी इत्यादि उच्चपदांवर काम केले आहे.

आतापर्यंतच्या त्यांच्या या वाटचालीतील महत्वपूर्ण कामगिरी म्हणजे त्यांनी आतापर्यांत 4000 तासांपेक्षा जास्त उड्डान केले आहे. देशसेवेचे हे कार्य यशस्वीरित्या भूषवित असताना त्यांना कारगील युद्धादरम्यान कारगिल विजय पदक अंदमान सेवा पदक 25,50 व 75 वर्षे भारतीय स्वातंत्र्य पदक विशेष सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे. याशिवाय महानिर्देशक, तटरक्षक प्रशंसा पदक आणि क्षेत्रिय महानिरिक्षक प्रशंसा पदकाने देखील ते गौरविले गेले आहेत. जिल्हयाच्या तटाच्या संरक्षणासोबत सागरी पर्यावरणाचे रक्षण ,प्रदूषण नियंत्रण, समुद्रातील मच्छिमार,खलाशांचे संरक्षण आणि त्यांना मदत करण्यासाठी माझी संपूर्ण टिम सदैव तत्पर असेल असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाप्रसंगी तटरक्षक दलातील आधिकारी वर्ग व अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version