| उरण | वार्ताहर |
मुंबई शिवडी -न्हावा शेवा सिलिंगचे प्रवेशव्दार म्हणून उदयास येत असलेल्या चिर्ले ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (दि.10) विविध विकास कामांचा शुभारंभ चिर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर उर्फ काका पाटील, उरण तालुका शेकापचे युवक संघटना उपाध्यक्ष दीपक मढवी व समिर मढवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जांभुळ पाडा अंतर्गत रस्तावर ग्रामपंचायत निधीतून पेव्हर ब्लॉक बसविणे, जांभुळ पाडा आदिवासी वाडी तिसाई देवी मंदिरासमोर समाज मंदिर उभारणे या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेर्ळीे प्रभाकर पाटील, जितेंद्र घरत, अशोक पाटील, राजेंद्र घरत, निवृत्ती पाटील, आकाश टकले, बेबी घरत, निखिल मढवी,निता कातकरी सर्व पक्षांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.