आजादी का अमृत महोत्सवात 2 ऑक्टोबर महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती जल्लोषात साजरी
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जन शिक्षण संस्थान, रायगडच्या वतीने 2 ऑक्टोबर रोजी सहाण-अलिबाग येथे वृक्षरोपण कार्यक्रम राबवून फिट इंडिया उपक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
कोरोनाजन्य परिस्थितीचे सर्व नियम पाळून व कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती, विविध स्वच्छता अभियान, आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून जन शिक्षण संस्थान, रायगडच्या वतीने दि. 13 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2021 या कालावधीत फिट इंडिया उपक्रमावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात आजपर्यंत 850 हून अधिक लाभार्थी सहभागी झाले.
या कार्यक्रमाप्रसंगी मोफत लिक्विड हॅन्डवॉश, सॅनिटायझिंग स्प्रे शिकवण्यात आले. कापडी मास्क, कापडी पिशव्या, यांचे देखील वाटप करण्यात आले. फिट इंडिया उपक्रमावर आधारित वृक्षारोपणच्या माध्यमातून फिट इंडिया व आझादी का अमृत महोत्सव 75 साल आझादी के ह्या कार्यक्रमांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, कायदेशीर मार्गदर्शन, व्होकल फॉर लोकल असे अनेक जनजागृती उपक्रमांबरोबर योगा व फिट इंडिया रन उपक्रम घेण्यात आला.
संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत स्कील से समृद्ध फिट इंडिया कार्यक्रम राबवित असताना याप्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, विजय कोकणे (संचालक), जन शिक्षण संस्थान रायगडचे कर्मचारी प्रतीक्षा चव्हाण (अकाउंट मॅनेजर), कल्पना म्हात्रे, सुकन्या नांदगावकर (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी), हिमांशू भालकर, ओंकार बोरकर, स्नेहा म्हात्रे, अजय पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा चव्हाण यांनी केले.