। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मनोज घरत यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी मनोज घरत यांच्या निवासस्थानी भेट देवून घरत कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी त्यांच्यासोबत अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघाचे शेकाप चिटणीस संदीप घरत, रायगड बाहेरचे संचालक प्रमोद घासे, संजय माळी, वरसोली ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेश घरत आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.