पंडित पाटील यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन

| भाकरवड | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत कुसुंबळे हद्दीतील कातळपाडा गावच्या रहिवासी स्व. वर्षा पाटील यांचे रविवार, दि. 1 जानेवारी रोजी वयाच्या 61 व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या निधनाची बातमी कळताच माजी आमदार पंडित पाटील, तसेच वरदानी माता मित्रपरिवाराने त्यांच्या निवास्थानी जाऊन पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यावेळी कुर्डूस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप पाटील, वरदानी माता मित्रपरिवाराचे संस्थापक सहा.पोलीस उपनिरीक्षक नरेश पाटील, मारुती पाटील, महेश पाटील, विद्याधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

स्व. वर्षा पाटील यांच्यावर कातळपाडा गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुली, एक मुलगा, भाऊ, बहिणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य दहावा बुधवार, दि. 10 जानेवारी रोजी, तर तेरावे शनिवार, दि.13 जानेवारी रोजी राहत्या घरी होणार आहे.

Exit mobile version