एफ एल सी अंतर्गत बचत गट कार्यक्रम संपन्न

। भाकरवड । वार्ताहर ।
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नाबार्ड च्या सहकार्याने 29 जून 2021 रोजी नाबार्डच्या स्थापना दिवसाचे आवचित्य साधून बचतगट महिलांना एकत्र करून पेण शहर शाखा अंतर्गत एफ, एल, सी च्या माध्यमातून आर्थिक आणि डिजिटल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोणतेही संकट येवो हार मानायची नाही, मग ती नैसर्गिक आपत्ती वादळ येवो वा कोरोना सारखी महामारी या वेळेस रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ,नाबार्डने स्थापन केलेल्या बचत गटांच्या माध्यमातून अतिशय उत्तम प्रकारे कार्यरत आहेत

बँकेच्या विविध योजना तसेच नाबार्डच्या विविध योजनांची विस्तृत प्रमाणात माहिती देण्यात आली त्यामध्ये बँकेच्या होम सेविंग,रिकरींग ,ठेवयोजना कर्ज योजना, आदींची माहिती यावेळी देण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बँकेच्या प्रोटोकॉल प्रमाणे सुरक्षित अंतर ठेवून, सेनेटायझर तसेच मास्कचा वापर करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहा होम सेविंग,तीन सेविंग,दोन रिकरींग,व एक डिपॉझिट अशी एकूण सोळा खाती नव्याने उघडण्यात आली.बर्‍याच महिन्याने बँकेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान बँकेच्या शाखाधिकारी विद्या राऊत यांनी भूषविले तर आभार अतुल बारटक्के यांनी मानले यावेळी बँकेचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते

Exit mobile version