| पनवेल | वार्ताहर |
तालुक्यातील रजनी भरत चांगू ठाकूर यांची सुकन्या आणि योगिता दीपक ठाकूर यांची सून प्राप्ती राज ठाकूर या कमर्शियल पायलट बनून आगरी समाजातील पहिल्या महिला पायलट झाल्या आहेत. याबद्दल पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पनवेलमध्ये भविष्यात येणार्या आंतरराष्ट्रीय एअरपोर्टमध्ये पायलटसोबतच इतरही महत्त्वाच्या विभागात आपल्या परिसरातील महिलावर्गालासुद्धा नोकरीच्या संधी आहेत. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्राप्ती ठाकूर यांना मिळालेल्या संधीतून भविष्यात पनवेल परिसरातील तरुणांना काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल, अशी प्रतिक्रिया प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केली.