दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

। उरण । वार्ताहर ।

रयत शिक्षण संस्थेचे तुकाराम हरी वाजेकर माध्यमिक विद्यालय फुंडे येथे शनिवारी (दि.24) दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मिलिंद खारपाटी, कृष्णाजी कडू, एम.जी. म्हात्रे, एस.जी. म्हात्रे, व्ही.के. कुटे, अस्मिता पाटील, देवरे जयश्री, साधना पाटील, आर.जी. शेळके उपस्थित होते. यावेळी नचिकेत म्हात्रे आणि आठवीच्या विद्यार्थिनींनी रयत गीत व स्वागत गीत सादर केले. तसेच, गांधी विचार परीक्षेत 6 मेडल पटकावणारा, एनएनएमएस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी वैभव गुट्टे याचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. यानंतर सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर प्रमुख अतिथी मिलिंद खारपाटी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व सांगत परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version