| चिरनेर | वार्ताहर |
रयत शिक्षण संस्थेचे तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे मंगळवारी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य एम. जी. म्हात्रे, कृष्णाजी कडू, संतोष म्हात्रे, एम. पी. तुमडे, एच. एन.पाटील, एस.डी. म्हात्रे, अस्मिता पाटील, जयश्री देवरे, वर्षा ठाकूर, आर. जी. शेळके या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन संपन्न झाले. शिक्षक दिनानिमित्ताने इयत्ता दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका बजावत इ. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. याप्रसंगी स्नेहल शिंदे, सत्यम सकपाळ, अक्षरा मुंडे, नागेश केंद्रे या विद्यार्थ्यांनी आपापल्या दिलेल्या भूमिका पार पाडल्या. पदाचा आनंद घेतला. तर शिपाई म्हणून बबलू आणि महेश जगताप या विद्यार्थ्यांनी त्यांचे काम चोख पार पाडले.