| मुंबई | प्रतिनिधी |
बृहन्मुंबई महानगरपालिकच्या निवडणुकीसाठी मुंबई विभागीय काँग्रेस समितीने संसदीय पडताळणी समिती गठीत केली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा एकनाथ गायकवाड यांच्या आदेशाने ही समिती गठीत करण्यात आलेली आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.
ही समिती जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत बैठक घेऊन जिल्हानिहाय समिती/जातवैधता आणि छाननी समिती यांच्यासोबत समन्वय साधून उमेदवारांच्या अर्जाची छाननी करेल तसेच जिल्हानिहाय पॅनल बनवतील. उमेदवारी अर्ज भरताना जिल्हा समिती बरोबरच ही समिती उमेदवारांना मदत करेल आणि पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन अंतिम यादी वरिष्ठांना सादर करणार असल्याचे सुरेशचंद्र राजहंस यांनी सांगितले.
काँग्रेसच्या संसदीय पडताळणी समितीची घोषणा

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606