काँग्रेसतर्फे कामथे रुग्णालयात फवारणी

। चिपळूण । प्रतिनिधी ।
कोरोना संकटकाळात रुग्णांची सेवा बजावण्यात महत्त्वाची कामगिरी करणार्‍या कामथे उपजिल्हा रुग्णालयाचे चिपळूण काँग्रेसतर्फे रविवार 27 जून रोजी सॅनिटायझेशन करण्यात आले. यावेळी चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाचे सावट आहे. कोरोना कधी संपेल? याची कोणतीही शाश्‍वती नाही. मात्र, या काळात चिपळूण काँग्रेसचे यादव यांनी मास्क, सॅनिटायझरसह अन्य साहित्य वाटप करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या महिनाभरापूर्वी कामथे उपजिल्हा रुग्णालयात अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी तसेच रुग्णांकरिता पाच हजार मास्कचे वाटप केले. तर रविवारी सॅनिटायझेशन करण्यात आले. यावेळी विजय देसाई, राजू जाधव, फैसल पिलपिले, कृष्णा महाडीक आदी उपस्थित होते.

Exit mobile version