कोकरे गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

। महाड । वार्ताहर ।
महाड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला, गेल्या काही दिवसापासून तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश करीत असल्याने विरोधकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. महाड तालुक्यातली नाते विभाग हा जरी शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी उद्धव ठाकरे यांना समर्थन करणारा गट देखील मोठा आहे. राज्यात शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर महाड तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समर्थन देणारे असंख्य कार्यकर्ते आहेत.

कोकरे गावातील सामाजिक कार्यकर्ते नारायण बुवा रांजणकर यांनी आमदार गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून त्यांच्या समर्थकांसह नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पक्षांमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत आ. गोगावले व तालुकाप्रमुख सुरेश महाडिक यांनी केले. यावेळी त्यांनी कोकरे विभागातील विविध विकास कामाकरता निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली. यावेळी तुकाराम पवार, निवृत्ती रामचंद्र पवार, एकनाथ मोरे, उपसरपंच नंदू नामदेव गोठल, बाबू भुरटे, राकेश पवार, वसंत रांजणकर, किसन पवार, विजय बटावले, जितू गोविंद पवार, दिनेश पवार, गणपत पवार, रोशन दावेकर सूहास रांजणकर, आकाश पवार, संदीप भद्रीके, अमोल बूर्टे, सूरज मोरे, पांडु काशिराम रांजणकर, संदीप पवार, पप्पू वसंत पवार, अनंत हीर्डेकर, सनी काटकर, सुदाम पवार, विठ्ठल रांजणकर, अल्पेश रांजनकर, राजेश पवार, अमोल बुर्टे, महेश पवार, अनंत पवार, यांच्या समवेत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला सदर पक्ष प्रवेश कोकरे येथेच संपन्न झाला.

याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, एकनाथ सुकूम महाड तालुका सहसंपर्कप्रमुख.गणेश खाबे अनिल पवार नितीन घाणेकर नंदु गोठल राजेश सुकूम राजू रिंगे नारायण जगताप तसेच या भागातील शिवसेना युवा सेनेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version