‌‘आदर्श’ ग्राहकांशी जोडली जात आहे: अभिजित पाटील

| अलिबाग | प्रतिनिधी |

आदर्श पतसंस्था सर्व परिवाराला लागणाऱ्या सोयी सुविधा देत आहे. लहान मुलांना मनीबॉक्स, कॉलेजमधील मुलांना मोबाईल ॲप, ज्येष्ठ सभासदांना डोअर स्टेप सेव, महिलांना खास सेवा व नवनवीन योजना आणत आहे. आदर्श पतसंस्था सर्व वयोगटातील ग्राहकांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन आदर्श
नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित सुरेश पाटील यांनी केले.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कुरूळ येथील क्षात्रैक्य चौकळशी माळी समाज सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अभिजित पाटील यांनी आदर्श पतसंस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला. रौप्यमहोत्सवी वर्षात 55 कोटी 13 लाख 51 हजार रूपयांच्या ठेवी वाढल्या
आहेत. ठेवी 358 कोटी 5 लाख 25 हजाराच्या झाल्या आहेत. ठेव वाढीचे प्रमाण 18.20 टक्के आहे. 260 कोटी 52 लाख रूपयाचें कर्जवाटप करण्यात आले आहे. एकत्रित व्यवसाय 618 कोटी 57 लाख रूपयांचा झाला आहे. संस्थेला 6 कोटी 10 लाख रूपयांचा नफा झाला आहे, संस्था कर्ज जलद वाटप करण्यासाठी तंत्रज्ञान आणत आहे अशी माहिती अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली.

खोपोली, कर्जत व बोर्ली – मांडला येथे संस्थेच्या नवीन शाखा सुरू करण्याचा व खोपोली येथील शाखेसाठी स्वमालकीची जागा विकत घेण्याचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला. तसेच गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही सभासदांना 11 टक्के दराने लाभांश जाहीर केला. आदर्श पतसंस्थेने लहान मुलांसाठी अनन्या बचत ठेव योजना सुरू करून त्यांचा बचतीची सवय लावली आहे. या योजनेचे 8 हजार खातेदार आहेत. या योजनेत 10 हजार खातेदार करायचे उद्दिष्ट आहे. यावर्षी संस्थेचा एकत्रित व्यवसाय 800 कोटी रूपयांचा करायचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील म्हणाले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष कैलास जगे, संचालक अनंत म्हात्रे, सतीश प्रधान, ॲड. आत्माराम काटकर, विलाप सरतांडेल, ॲड. रेश्मा पाटील, ॲड. वर्षा शेठ, सुरेश गावंड, भगवान वेटकोळी, रामभाऊ गोरिवले, महेश चव्हाण, श्रीकांत ओसवाल, संजय राऊत, डॉ. मकरंद आठवले, मीनाक्षी पाटील यांची उपस्थिती होती.

Exit mobile version