| कोलाड | वार्ताहर |
सोमवार दि.20 जानेवारी 2025 रोजी, विनय कंटक, गौरी कंटक, व महादेव शहापूरकर यांच्या सहकार्याने व कृपा आशिर्वादाने विले पार्ले मठातून विनय कंटक स्वामी यांनी दिलेल्या दीड कोटी श्री स्वामी समर्थ जप लिहिलेल्या पवित्र वह्या रोहा तालुक्यातील कोलाड परिसरातील विठ्ठलवाडी, पोस्ट चिंचवलीतर्फे अतोणे येथील भटकी व उनाड गुरे, कुत्रे, इतर विविध प्राणी यांच्या जखमीवर उपचार व पालन पोषण करणार्या या स्वामी समर्थ मठाच्या जागेत संस्थेचे संस्थापक श्री गणेश नायक यांच्या उपस्थितीत विधीपूर्वक स्थापित करण्यात आल्या. सर्व विधी महेश जंगम स्वामी यांच्या हस्ते करून या मठाच्या बांधकामाची मंगलमय सुरुवात करण्यात आली.
यावेळी महेश स्वामी जंगम, प्रशांत दपके, संजय मोते, निलेश भाऊ पाटील उपस्थित होते. लवकरच या पवित्र मठाचे बांधकाम सुरू होत आहे. आम्ही सर्व स्वामी भक्तांना नम्र आवाहन करतो की, या पवित्र कार्यात सहकार्य करून आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आव्हान संस्थेचे संस्थापक गणेश नायक यांनी केले आहे. स्वामी समर्थांच्या आशिर्वादाने आणि आपल्यासारख्या भक्तांच्या साथीनेच आम्ही हजारो प्राण्यांची सेवा करत आहोत. या पवित्र कार्याला एकत्रितपणे यशस्वी बनवूया, असे ते पुढे म्हणाले.