ग्राहक जनसंपर्क अभियान कार्यक्रम उत्साहात

। अलिबाग । वार्ताहर ।
वित्तिय सेवा विभाग, भारत सरकार, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बँक ऑफ इंडिया लीड डिस्ट्रिक्ट बँक, रायगड यांच्या सहकार्याने हॉटेल होरिजन, वरसोली, अलिबाग येथे ग्राहक जनसंपर्क अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, बँक ऑफ इंडियाच्या झोनल मॅनेजर शंपा बिस्वास, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक प्रदीप अपसूंदे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानचे जिल्हा व्यवस्थापकसिद्धेश राऊळ, उपविभागीय जिल्हा कृषी अधिकारीकैलास वानखेडे, जिल्हा उद्योग केद्रांमार्फत प्रबंधक श्याम चकोर, ओबीसी महामंडळ रायगडचे प्रबंधक निशिकांत नार्वेकर, मत्स्य व्यवसाय विभागाच्या, नोडल अधिकारी सोनल तोडणकर आणि जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी, आर.सी.टी.संचालकआनंद राठोड तसेच सर्व बँकेचे शाखा अधिकारी, सर्व जिल्हा समन्वयक तसेच ग्राहकवर्गाची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती.
या कार्यक्रमात 80 लाभार्थ्यांना 3 कोटी 54 लाखांचे मंजूरी पत्र देण्यात आले. यामध्ये उमेद अभियानातील महिला स्वयं सहाय्यता समूहाचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी उमेद अभियानातील सी.आर.पी., बँक सखी, स्वयं सहाय्यता समूहातील महिला सदस्या, मुद्रा लोन, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. बँकेमध्ये उत्कृष्ट काम करणारे बँक मित्र, कर्मचारी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टार प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षिका मीना श्रीमाळी यांनी केले.

Exit mobile version