| मुरुड- जंजिरा | प्रतिनिधी |
जिंदल विद्या मंदिर साळाव येथे चालू शैक्षणिक वर्षासाठी यूकेजी पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. अळ्यापासून फुलपाखरापर्यंत या आकर्षक संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाने लहानग्यांच्या शैक्षणिक प्रवासातील सुंदर परिवर्तन अधोरेखित केले.
प्राचार्य मुकेश ठाकूर यांच्या कुशल नेतृत्वाखाली कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. उपप्राचार्य मंगेश बामनोटे यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाला बळ मिळाले. समारंभात लहानग्या विद्यार्थ्यांनी आकर्षक पदवीदान पोशाख परिधान करून आत्मविश्वासाने मिरवणूक काढली. टाळ्यांच्या गजरात त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य व गीतांच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणप्रवासाचे सुंदर चित्रण करण्यात आले. त्यांच्या निरागस सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज मलिक यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
जिंदल विद्या मंदिरात पदवीदान सोहळा
