। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील नागाव हायस्कूल येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजने अंतर्गत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात 17 केंद्रातील स्वयंपाकी महिलांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी तृणधान्यांचा वापर करून आकर्षक मांडणी, चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवण्यात आले होते.
यावेळी सरपंच हर्षदा मयेकर, गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक, साधन व्यक्ती, लेखाधिकारी आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जि.प केंद्र शाळा आंदोशी, द्वितीय क्रमांक जि.प. केंद्र शाळा पेझारी, तृतीय क्रमांका जि.प. केंद्र शाळा ताजपुर-सुडकोली तसेच, उत्तेजनार्थ जि.प. केंद्र शाळा खानाव केंद्र _खानाव अशाप्रकारे बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन हरवडे यांनी केले. तर, उमेश ठाकूर यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी नागाव हायस्कूलचे सन्माननीय अजित पाटील, सहकारी शिक्षक व इतर कर्मचार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.