। हमरापूर । प्रतिनिधी ।
सहकारी संस्थांमुळे छोट्या व्यवसायांना चालना मिळते असे, उद्गार रायगड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक हरलय्या यांनी काढले आहेत. पेण तालुक्यातील हमरापुर येथे श्री सिद्धिविनायक हमरापुर विभाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना हरलय्या यांनी औद्योगिक संस्थेला मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बँक ऑफ इंडियाचे उप विभागीय प्रबंधक विजय कुमार कुलकर्णी तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक हरलय्या, पेण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक मोकल, महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, अमरावती विभाग श्री गणेश उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष जयेश पाटील, उपाध्यक्ष कृष्णा गोलीमडे, श्री सिद्धिविनायक सोसायटीचे अध्यक्ष संदेश कदम, उपाध्यक्ष श्रीराम ठाकूर, कार्याध्यक्ष निशिकांत गायकवाड, खजिनदार विनोद नाईक, सचिव मितेश पाटील, सहसचिव राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.